गडचिरोली पोलीस भरती २०२३ : लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीची ‘अश्विनी भालेराव’ या विद्यार्थिनीची यशोगाथा

2515

मी अश्विनी भालेराव, माझे गाव मूरखळा नवेगाव ता. जि. गडचिरोली. माझे ७ वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरखळा येथे झाले. १० वी पर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय नवेगाव मूरखळा येथे झाले त्यानंतर १२ वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा काम्प्लेक्स हायस्कूल सोनापूर कॉम्प्लेक्स येथे झाले. बारावी मध्ये मी तिसऱ्या क्रमांकांनी पास झाली. माझे महाविद्यालयीन शिक्षण गडचिरोली येथे झाले. २०१५ मध्ये माझे लग्न पोरला येथील पंकेश तेजराम राऊत यांच्याशी झाले. त्यानंतर माझ्या शिक्षणात ७ वर्ष खंड पडले त्याच कालावधीत मला कल्याणी नावाची मैत्रीण मिळाली. ती पोलीस भरतीची तयारी करत होती माझी तिच्याशी ओळख झाल्यानंतर मी बघितलेले स्वप्न मनात पुन्हा घर करू लागले, पोर्ला येथे ग्रामपंचायत तर्फे वाचनालयाची सुरुवात झाली. मला कुटुंबातील व्यक्तीमुळे वाचनालयात अभ्यास करायला संधी मिळाली. कल्याणीने मला लक्ष्यवेध अकॅडमी बद्दल सांगितले आणि मी लक्ष्यवेध अकॅडमीमध्येे प्रवेश घेतला. मी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ येथे प्रवेश घेतला आणि तेथील वस्तीगृहात राहू लागले. लक्ष्यवेध अकँडमीचे संचालक राजीव सर शिस्तीने फार कडक आहेत आणि मला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लेखी परीक्षेची तयारी करायची होती म्हणून मी सुद्धा त्यांना फार घाबरत होती परंतु आज त्यांच्याच योग्य मार्गदर्शनामुळे माझी निवड गडचिरोली येथील पोलीस दलात वाहन चालक म्हणून झालेली आहे याचे सर्व श्रेय मी प्राध्यापक राजीव सर व प्राध्यापक नंदनवार सर यांना देते. या यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यास सहकार्य करणारे माझे आई-वडील, माझे पती, माझी मुलगी, सासू-सासरे, व मित्र-मैत्रीणी याचां मोलाचा वाटा आहे.. मला माझे मनोगत लिहिण्याकरीता संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘The गडविश्व’ चे संपादक सचिन जिवतोडे सर यांचे मनापासून धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here