– उंची चा वाद पोहचला नागपूर खंडपीठात
The गडविश्व
गडचिरोली, २१ जुलै : जिल्हयातील पोलीस भरती विविध प्रकरणांनी चर्चेत आली असतांना आता या भरतीत एका उमेदवाराच्या उंचीचा वाद थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेला असुन याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना दोन आठवडयात खुलासा देण्याचे निर्देश दिले आहे.
गडचिरोली पोलीस भरतीत प्रदीप मल्लेलवार या उमेदवाराची शारीरीक चाचणी दरम्यन त्याची उंची पहिल्यांदा १६५ से.मी इतकी भरली होती तेव्हा त्याला पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरविले होते. मात्र २२ मे २०२३ रोजी त्याचा पुन्हा बोलावले व उंची मोजती असता १६४.६ से.मी. इतकी भरल्याने त्यास अपात्र ठरविले गेले. दरम्यान त्यास अपात्र करतांना कुठलाही लेखी तपशील दिला गेला नाही त्यामुळे प्रदीप मल्लेलवार याने वकीलामार्फत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. १९ जुलै रोजी ही याचिका दाखल करून घेत खंडपीठाने पोलीस अधीक्षकांना दोन आठवडयात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असुन पहिल्यांदा बरोबर उंची आणि नंतर कमी उंची कशी काय भरू शकते याबाबत तर्क वितर्क लावल्या जात आहे.