गडचिरोली पोलिसांनी विविध कारवाईत दारूसह ३२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

93

– पाच आरोपीतांना अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी छुप्या मार्गाने दारूची तस्करी जिल्ह्यात केली जाते. माओवाददृष्टया अतिसंवेदनशिल गावात दारु माफिया हे गोर गरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करुन तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांचे राहते घरात दारुची अवैध साठवणुक करुन ठेवत असल्याचा प्रकार गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आल्याने गडचिरोली पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेत चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत वाहनासह अवैध दारुचा एकुण ३२ लाख ९५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी पाच जणांना अटकही केली आहे. सादर कारवाईने अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरंचा हद्दीतील माओवाददृष्टया अतिसंवेदनशिल नैनगुंडम या गावात २३ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान गोपनिय बातमीदारांकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील कमलापुर येथे राहणारा ईसम पुरुषोत्तम हनमलवार याने नैनगुंडम गावातील आपले साथीदार संतोष भिमा सिडाम व गणेश सालय्या आलाम यांच्या मदतीने संतोष सिडाम याचे राहते घरी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी दारु व काळ्या गुळाची साठवणुक करुन ठेवली असल्याबाबतची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर माहितीवरुन वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाचे दोन टिम व प्राणहीता अहेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करुन गोपनियरित्या प्रोव्ही रेड कार्यवाही करीता रवाना असता पोलीस पथकांनी नैनगु्ंडम गावातील संतोष सिडाम याचे राहते घरी जावुन प्रोव्ही रेड करून देशी दारू, काळ्या गुळाच्या पेट्या असा एकूण १२ लाख २६ हजारांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संतोष सिडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. तर गुन्ह्रातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार हा कार्यवाहीची चाहुल लागल्याने फरार झाला असून पोलीस पथकाद्वारे त्याचा शोध घेणे सुरु आहे.

दुसऱ्या कारवाईत चंद्रपूर जिल्ह्यातून पोस्टे अहेरी हद्दीत अवैधरित्या दारु तस्करी होत असल्याबाबच्या गोपनिय माहितीवरुन २६ जून रोजी अहेरी पोलीसांनी बोटलाचेरु गावाजवळ सापळा रचून संशयीत वाहन थांबवून वाहनांची चौकशी केली असता ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक मोहम्मद इलीयास शेख रा. बालाजी वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध दारुबंदी कायद्यांन्वये पोस्टे अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत पोस्टे अहेरी येथील पोलीस पथक २४ जून रोजी नाईट गस्त करित असतांना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका संशयित महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम एच ३८ एक्स ३०५५ वाहनाजवळ जाऊन विचारपूस केली असता, वाहनातील चालक हा पोलीसांना पाहून पळुन गेला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूचा साठा आढळून आल्याने वाहनासह एकुण १० लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोस्टे अहेरी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चौथ्या कारवाईत गोपनिय बातमिदाराकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारु विक्री होत असल्याबाबतच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर २४ जून रोजी अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता गंगाराम बकय्या नेरला व नागेश सोमा नेरला दोघेही रा. लिंगमपल्ली तह. अहेरी हे अवैध दारु विक्री करित असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून देशी – विदेशी दारू साठा अंदाजे किंमत ५ लाख ८३ हजार १७० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अशा चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत गडचिरोली पोलीस दलाने वाहनासह अवैध दारुचा ३२ लाख ९५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरच्या विविध कारवाया पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे, पोनि. स्थागुशा उल्हास भुसारी, पोस्टे अहेरी प्रभारी अधिकारी पोनि. दशरथ वाघमोडे, सपोनि. राहुल आव्हाड, पोउपनि. राजू गवळी, पोउपनि. विजय सपकाळ, मपोउपनि. सरीता मरकाम, मपोउपनि. करुणा मोरे, परिपोउपनि. संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलीस जवानांनी केलेली आहे.

(thegdv, thegadvishva, gadchirolinews, modi avas yojna, kurkheda, gadchiroli local news, Brazil vs Costa Rica, Croatia vs Italy,Albania vs Spain, Axar Patel,Gautam Adani, AFG बनाम BAN, OnePlus Nord CE 4 Lite, भारत बनाम ऑस्ट्रेलिया, Messi, PM Modi, SSC CGL )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here