– पावसाच्या व्यतयाने पुढे ढकलली चाचणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाईच्या अश्या एकूण ९२२ जगांकरिता १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रिया गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर सुरू झाली आहे. दरम्यान सुरुवातीला मैदानी चाचणी घेण्यात येत असून या भरती प्रक्रियेत आता पावसाने एन्ट्री केल्याने शनिवार २२ जून रोजी होणारी पोलीस भरतीची मैदान चाचणी रद्द करण्यात आली आहे. तशी माहितीही गडचिरोली पोलिस दलाच्या अधिकृत ट्विटर एक्स वरून कळविण्यात आली आहे.
१९ जुन पासुन पोलीस शिपाई चालक तर २१ जुन पासुन पोलीस शिपाई पदभरतीस प्रारंभ करण्यात आला. पोलीस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी १००० उमेदवारांची व पोलीस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी १३०० उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी १९ जून ते १२ जुलै २०२४ या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र गडचिरोलीमध्ये २१ जून रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शनिवार २२ जून रोजी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याने २२ जून रोजी होणारी मैदानी चाचणी रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे. सदरची रद्द झालेली मैदान चाचणी १३ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत उमेदवारांना कळवण्यात येणार आहे तसेच २४ जून रोजी होणारी मैदान चाचणी व त्यापुढील मैदानी चाचणीमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी असेही पोलीस दलामार्फत कळविण्यात आले आहे.
https://x.com/sp_gadchiroli/status/1804194504561562074?s=12&t=3QaQ8qT3g3shsl4scPoTjQ
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #policerecrutment #policebharti2024 #gadchirolipolicebharti2024 #T20worlscup )