गडचिरोली : कुरखेडा तालुक्याअंतर्गत कोतवाल निवड समिती अंतर्गत पदभरती

1396

The गडविश्व
गडचिरोली, ३० जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याअंतर्गत कोतवाल संवर्गाची अनुसुचित जमाती क्षेत्रातील (100 टक्के) पेसा मौजा बोरटोला, कटंगटोला, हुऱ्यालदंड, लेंढारी, पळसगाव, कातलवाडा, चांदागड, पुराडा, तळेगाव, कुरखेडा व परिशिष्ट अ नुसार (शासन निर्णय २८ फेब्रुवारी ) घाटी, गोवारहुडकी उर्फ वागदरा, येरकडी या रिक्त असलेल्या जागेकरीता पदभरती करावयाची असुन त्याकरीता जाहिरातीमधील नमुद स्थानिक गावातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इमाव संवर्गातील आवश्यक अर्हताधारक व्यक्तीकडून विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने ०१ ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत तहसिल कार्यालय, कुरखेडा येथे अर्ज मागविण्यात येत आहे.
कोतवाल या पदाचे सरळसेवा भरतीप्रक्रियेचा सविस्तर जाहिरनामा तहसिल कार्यालय, कुरखेडा, पंचायत समिती कुरखेडा संबंधित वरिल गावातील चावडीवर, तलाठी कार्यालय येथील नोटीस बोर्डावर ३१ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्थानिक उमेदवारांनी जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेचे निकष व विहित अटी व शर्तीवर अर्ज तहसिल कार्यालय, कुरखेडा येथे सादर करावे. असे सदस्य सचिव कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार, कुरखेडा राजकुमार धनबाते यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here