The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : विधानसभा निवडणूक पारदर्शक व दारूमुक्त व्हावी, यासाठी जिल्हाभरातील मुक्तीपथ गाव संघटना, शक्तीपथ संघटना, वॉर्ड संघटना यांच्या माध्यमातून ठराव घेण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण १९७ गावांतून १०७९०मतदारांनी स्वाक्षरी करीत दारूच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
मुक्तिपथ- शक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून १९७ गावातील ग्रामस्थांना दारूमुक्त निवडणुकीची संकल्पना पटवून देण्यात आली. पूर्ण शुद्धीत राहून मतदान करता येते, योग्य उमेदवार निवडता येते. गावाची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात भांडणे शक्यतो होत नाही. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. हे दारूमुक्त निवडणुकीचे फायदे लोकांना पटवून देण्यात येत आहे. जिल्हाभरात दारूमुक्त निवडणुकीचे आवाहन करणारे बॅनर पोस्टर लावून जागृती सुरू आहे. निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पुर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप न झाल्यास निवडणूक शांततेत पार पडणार, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये, याची काळजी घ्यावी. असेही आवाहन करण्यात आले.
सद्यस्थितीत वडसा १५, आरमोरी १७, कुरखेडा १२, कोरची १५, धानोरा १९, गडचिरोली १९, चामोर्शि २३ , मुलचेरा २०, एटापल्ली १८, भामरागड २, अहेरी १०, सिरोंचा २७ अशा एकूण १९७ गावातून १०७९० स्वाक्षरीसह मुक्तिपथ गावसंघटना, शक्तिपथ संघटना व वार्ड संघटना यांचे द्वारा विधानसभा निवडणूक दारूमुक्त निवडणूक व्हावी, यासाठी ठराव घेण्यात आले. या गावातील मतदारांनी मतदान दारूमुक्त व शांततेत होण्यासाठी मी दारू स्वीकारणार नाही, पिणार नाही व पूर्णपणे जागरूक राहून मतदान करणार असा संकल्प करीत दारूमुक्त निवडणुकीचा ठराव पारित केला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )