गडचिरोली : लग्नास नकार दिल्याने गळफास घेत संपविली जिवनयात्रा

2317

– प्रेम प्रकरणाचा बळी
The गडविश्व
गडचिरोली, २० जून : दोघांचे काही महिण्यांपूर्वी सुत जुळले आणि प्रेमप्रकरणाला सुरूवात झाली मात्र लग्न करण्यास प्रियसिने नकार दिल्याने प्रियकराणे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी रात्रो १० वाजताच्या सुमारास घडली. गणेश अशोक कागदेलवार (२२) रा. घोट असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक गणेश याच्या घरा शेजारी असलेल्या मुलीसोबत गेल्या सहा महिण्यांपुर्वी प्रेम संबंध होते. तिला लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा करीत होता. मात्र सदर मुलीने लग्नास नकार देवून घोट पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. त्यावरून दोघांनाही घोट पोलीस मदत केंद्रात बोलावून समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मुलीने तक्रार देणार नसल्याचे सांगितले व दोघेही आपआपल्या घरी आले. मुलीने लग्नास नकार दिल्याने त्याच्या मनावर परिणाम घेवून आपल्या राहत्या घरी घराच्या लोखंडी आळयाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस करीत आहे.
(the gadvishva, the gdv, gadchiroli news, ghot)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here