गडचिरोली : ‘शेतकरी कामगार पक्ष’ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात

313

– नामनिर्देशन अर्ज केले सादर
The गडविश्व
गडचिरोली, ३ एप्रिल : कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘शेतकरी कामगार पक्ष’ उतरले असून आज शेवटच्या दिवशी पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या मार्गदर्शनात महिला नेत्या जयश्रीताई वेळदा आणि जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर करुन प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातून तुकाराम गेडाम, देवेंद्र भोयर, निशा आयतुलवार यांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले. प्राथमिक कृषी पत सहकारी संस्था मतदार संघातून तुळशीदास भैसारे, भास्कर ठाकरे, चंद्रकांत भोयर, योगाजी चापले, सुरेश गेडाम, नितिन मेश्राम, महिला राखीव उमेदवार सुजाता रायपुरे, सखुबाई पालकवार यांनी तर व्यापारी – अडते गटातून मनोहर भोयर यांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले.
यावेळी सुचक म्हणून विलास अडेंगवार, भास्कर कोल्हे, जयाताई मंटकवार, मुर्लीधर गंधलवार, रामचंद्र झरकर, सोमनाथ डहलकार, गणपत सोधूरवार, हरिचंद मंटकवार, ढेकलू गावतुरे, केशव भोयर, हंसराज चंदनखेडे, अतुल आंबोरकर तर अनुमोदक म्हणून सरपंच दर्शना भोपये, सावित्री गेडाम, अंतकला मुनघाटे, ताराबाई भैसारे, शामराव ठाकरे, कवडूजी रोहनकर, रोहिदास रामटेके, रामदास येरावार, वासुदेव भोयर, गजानन रायपूरे राजेश मंगर प्रामुख्याने उपस्थित होते.
अक्षय कोसनकर, कैलास शर्मा, विनोद मेश्राम, तितिक्षा डोईजड, सुरज ठाकरे, गायत्री मेश्राम, सुरज हजारे यांनी यावेळी परिश्रम घेतले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) (Home theater explosion; Four people including a girl were injured and two died) (Gadchiroli: ‘Shetkari Kamgar Party’ in the election arena of Agricultural Produce Market Committee)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here