गडचिरोली : २६ जुलै ला ‘रौप्य महोत्सवी कारगील विजय दिवस’ साजरा होणार

254

The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : कारगील क्षेत्रातील युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा पराभव केला. या ऐतिहासिक घटनेला २६ जुलै ला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने गडचिरोली येथील कारगिल चौकातील कारगील स्मारक येथे ‘रौप्य महोत्सवी कारगील विजय दिवस’ साजरा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी, युवक युवती आणि देशभक्त नागरिकांना देशभक्ती जागृत करणारे स्थळ हे गडचिरोली येथील कारगील चौक आहे. येथे २००० या सालापासून दरवर्षी कारगील युद्धातील वीर शहीद सैनिकांना आदरांजली वाहून विजय दिवस नित्य नेमाने मोठया उत्साहात कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष कालू गोवर्धन, मार्गदर्शक माजी सैनिक कन्हेय्यासिहं बैस, सुनील देशमुख, नरेश चन्नावार, मोबीन सय्यद, मोतीराम हजारें, प्रकाश धकाते, डॉ. नरेश बिडकर, नंदू कुमरे, विलास जुवारे आदी सदस्य साजरा करीत असतात.
या युद्धाला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्षा निमित्याने गडचिरोली शहरातील कारगील स्मारक येथे माजी सैनिक, पोलीस विभाग, सिआरपीएफ, एनसीसी, स्काऊट गाईड पथक हे मानवंदना देतील. या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.
यावेळी जिल्ह्यातील माजी भारतीय सैनिक आणि कारगील युद्धात सहभागी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निवृत्त कर्नल विक्रम मेहता, उदय धकाते, निवृत्त सुभेदार ऋषीं वंजारी, माजी सैनिक महादेव वासेकर, राजू भांडेकर, माजी सुभेदार नामदेव प्रधान, दिगंबर गेडाम, ईश्वर राऊत,सुचिता धकाते, निलिमा देशमुख, विद्या कुमरे, वनिता धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे आदी प्रयत्न करीत आहे.

मागील २५ वर्षांपासून गडचिरोली शहरातील कारगिल युद्धात शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात येत आहे. या दिवसाला २५ वर्ष पूर्ण होत आहे. येथे भव्य आकर्षक स्मारक उभारण्यात आले आहे. हा कारगील विजय दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रम ला नागरिकांनी उपस्थित राहावे.
-उदय धकाते, अध्यक्ष, कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली.

(#thegdv #thegadvisha #gadchirolinews #kargilvijaydivas #kargil chouk gadchiroli )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here