गडचिरोली : भर पावसातही जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

3328

– जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : शासनाने 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 24 जूलै 2024 रोजी जिल्ह्यात मुसाधर पाऊस असतानाही गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, (वय ४५) , रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली असे त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लच्चु ताडो 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून नक्षल्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षल्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षल्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल नक्षल्यांना माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता. 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत.
त्याचा 2022 मध्ये ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षल्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal )

।।।।।।।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here