The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : शहरातील लांझेंडा वॉर्ड क्र.4 येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मुक्तिपथ वॉर्ड संघटन सदस्यांनी निवेदनातून गडचिरोली पोलिस स्टेशनला केली आहे.
गडचिरोली शहरातील लांझेंडा वॉर्ड क्र.4 येथील दारू विक्री बंद करण्यासाठी वॉर्ड संघटन यांनी कंबर कसली आहे. वॉर्डातील दारू बंदीसाठी पोलीस तक्रार करणे, दारू विक्री करणाऱ्यांविरोधात अहिंसक कृती करणे, दारूविक्रेत्यांवर पाळत ठेवणे अशाप्रकारे वॉर्ड संघटनेकडून कार्य सुरु आहेत. मात्र, चोरट्या मार्गाने दारूविक्री करणाऱ्यांकडून वॉर्ड संघटनेच्या सदस्यांना शिवीगाळ व धमकावणे असे कृते होत आहेत. त्यामुळे दारू विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करून दारूमुक्त वॉर्ड निर्माण करण्याची मागणी मुक्तिपथ वॉर्ड संघटनेच्या सदस्यांनी गडचिरोली पोलिसांकडे केली आहे