– धानोरा येथील बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : धानोरा शहरातिल व ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांनी वारंवार कारवाही करावी. तसेच गावात व शहरातील लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मिश्रित रसायन, भेसळयुक्त ताडी- शिंदी विक्री करणाऱ्यावर पोलिस विभागाने कारवाई करण्याचे निर्देश मुक्तिपथ तालुका समिती अध्यक्ष तथा तहसिलदार अविनाश शेंबटवाट यांच्या मार्गदर्शनाखाली, ए. बी लोखंडे नायब तहसीलदार यांनी दिले.
धानोरा तहसील कार्यालयात दारू व तंबाखू गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत तालुका समितीच्या झालेल्या मासिक बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीला प्रशांत एस. जंगले API पोलिस स्टेशन धानोरा, डॉ. अविनाश दहिफळे तालुका आरोग्य अधिकारी, गौतम व्हि. राऊत ग्रामीण रुग्णालय (NCD समुपदेशक), विनाताई सहारे कार्यालय अधीक्षक नगरपंचायत, सुरज सु. देशमुख WOTR संस्था, राजेश के. बोवाडे WOTR संस्था, शिशुपाल लोनारे BAIF संस्था, पी. जी. अटेल तहसील कार्यालय, राहुल जे. महाकुलकर तालुका संघटक, भास्कर कडयामी तालुका उपसंघटक, बुधाताई ए. पोरटे तालुका प्रेरक, शीतल ए. गुरणूले मुक्तिपथ कार्यकर्ती उपस्थित होते.
यावेळी धानोरा तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय तंबाखू मुक्त करणे, तसेच प्रवेशद्वारावर आमचे कार्यालय, शाळा, महाविद्यालय, खाजगी कार्यालय तंबाखूमुक्त असलेला बोर्ड लावणे, कोटपा कायदा 2003 नुसार दंड आकरण्यात येईल, असे फलक लावणे बंधनकारक आहे असे ठरविण्यात आले. शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय च्या 100 मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणावर कोटपा कायद्यानुसार येथील अधिकारी, मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांनी कोटपा कायद्यानुसार कारवाई करावी असे ठरविण्यात आले. तंबाखूमुक्त शाळा निकष नुसार शाळा तंबाखू मुक्त असाव्या, BEO यांनी दर शाळेला पत्र पाठवून नोडल ऑफिसर मुख्याध्यापक यांनी कृती करण्यास सांगावे, असे ठरविण्यात आले. मुक्तिपथ गावसंघटन महिलांनी दारू सबंधित अहिंसक कृती केल्यास पोलिस विभाग यांनी दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून तसेच महिलाना सहकार्य करणे. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत समितीची बैठक व कृती व्हाव्या यासाठी BDO यांनी ग्रांमपंचायतला पत्र पाठवावे, तसा सचिवाकडून अहवाल मागावे असे ठरविण्यात आले. तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून ANM, आशा वर्कर यांचे कडून खर्रा तंबाखू जन्य पदार्थाची किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता यांच्या बैठकीत व्हीनायल शिट च्या माध्यमातून होणारे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगणे. पोलिस विभाग अंतर्गत गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी, गावातील पोलिस पाटील यांची मुक्तिपथ चमू सोबत कार्यशाळा आयोजित करणे. आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
