– पतसंस्थेवर शिक्षक मित्र पॅनलचा कब्जा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या २०२५-३० कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत ‘शिक्षक मित्र’ पॅनलने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत देवेंद्र लांजेवार यांच्यासह १२ उमेदवारांनी विजयी मजल मारली.
आशिष धात्रक यांच्या नेतृत्वाखालील ‘शिक्षक मित्र’ पॅनलने प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा धडाका उडवला. विजयानंतर नवनिर्वाचित संचालकांनी शिक्षकांचे हित जपण्याच्या वचनांची पूर्तता करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, लवकरच जाहीरनाम्यानुसार ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
