– २० दिवसांपासून होता बेपत्ता
The गडविश्व
गडचिरोली ९ सप्टेबर : धानोरा तालुक्यातील तुकुम येथील मागील २० दिवासांपासून बेपत्ता असलेल्या राकेश दामजी कोरेटी (३०) रा. तुकुम याचा मृतदेह लेखा नदी तिरावर ८ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्यासुमारास आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश हा अविवाहित असून तुकुम येथे आपली आई व लहान भावासोबत राहत होता. १८ ऑगस्ट रोजी तो आपल्या नातेवाईकाला रक्त देण्यासाठी ब्रम्हपूरी येथे गेला होता. दरम्यान रात्रो गडचिरोली येथे मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला येण्याकरिता निघाला व भावाने फोन केला असा लेखा येथे पोहचल्याचे त्याने सांगितले परंतु तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद दाखत होता. याबाबत नातेवाईकांनी घटनेची माहिती धानोरा पोलीस ठाण्यात दिली. तेव्हापासून नातेवाईक त्याचा शोध घेत होत मा तो मिळून आला नाही. ८ सप्टेंबर रोजी लेखा येथील शेतात मृतदेह आढळून आला. धानोरा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृताची ओळख पटविली. दरम्यान तो पाण्यात वाहून गेल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, dhanora, lekha, crime news)