गडचिरोली : मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

623

-जिल्हाधिकाऱ्यांचे संजय दैने यांचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली,दि.०४ : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी १९ एप्रिल २०२४ रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.
12 गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात, सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
(#thegdv #gadvishva #gadchirolilocalnews #loksabhaelection2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here