– गळफास घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
The गडविश्व
गडचिरोली, २५ एप्रिल : घरात कोणीही नसतांना रात्रोच्या सुमारास युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना गडचिरोली शहरातील विवेकानंद नगर येथे २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गणपत अनिल वरगंटीवार (२१) रा. विवेकानंदनगर गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
शहरातील विवेकानंदनगर येथील युवक गणपत वरगंटीवार हा रात्री घरात एकटाच होता. दरम्यान रात्रो त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपाविली. मंगळवार २६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना दिसून आला. घटनेची माहिती पोलीसांना कळविण्यात आली असता घटनास्थळ गाठून पोलिसांनी पंचनामा केला व मर्ग दाखल करण्यात आला. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. ©
(the gdv) (the gadvishva) (suicide) ( GADCHIROLI )