– धुमाकुळ घालणाऱ्या टी -६ वाघिणीला जेरबंद करण्याचे शासनाचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, ५ जानेवारी :अनेक दिवसांपासून गडचिरोली वनविभागातील गडचिरोली, पोर्ला व चातगाव वनपरिक्षेत्रात मोकाट असलेली टी -६ वाघीण अखेर आता जेरबंद होणार आहे. तसे आदेश ३० डिसेंबर ला शासनाने काढले आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली वनविभागात टी-६ वाघिणीने दहशत माजवत अनेकांचा बळी घेतला. वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश प्रथमतः देण्यात आले होते मात्र सदर वाघिणीस पिल्ले असल्याचे निदर्शनास आल्याने जेरबंद करण्याचे आदेश तूर्तास थांबविण्यात आले. मात्र सदर वाघीण मोकाट असल्याने परिसरात दहशत पसरली असतांना सुद्धा परिसरात मानवावर हल्ले झाल्याने नागरिकांनी वाघिणीला जेरबंद न केल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच वाघिणीला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. अखेर ३० डिसेंबर ला पुन्हा दुसरा आदेश काढत शासनाने सदर वाघिणीचे पकडण्याचे आदेश दिल्याचे कळते.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Crystal Palace vs Tottenham) (Barcelona) (Leeds United vs West Ham) (Varisu Trailer) (Ssc.nic.in) (Muktipath) (Gadchiroli Tiger)