गडचिरोली : अखेर ‘त्या’ नरभक्षक वाघाला केले जेरबंद

188

– वनविभागाच्या आरआरटी पथकाची कामगिरी
The गडविश्व
मुलचेरा, दि. १९ : तालुक्यातील मथुरानगर व कोडसापूर आणि चिंतलपेठ येथील दोन महिलांवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. त्या घटनेने नागरिक वाघाच्या दहशतीत होते. नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा जि.प.माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आविस व काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी यांनी वनविभागाला दिले होते. या मागणीची व इशाऱ्याची तात्काळ दखल घेतअखेर त्या नरभक्षक वाघाला वनविभागाच्या आरआरटी पथकाने जेरबंद केल्याने वनविभागचे अधिकारी व आरआरटी पथकाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आभार मानले आहे. तर नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दक्षिण गडचिरोलीतील मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये त्या नरभक्षक वाघामुळे भीतीचे वातावरणात पसरले होते. नरभक्षक वाघाच्या हल्ल्याने मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने तात्काळ पाऊल उचलत नरभक्षक वाघास जेरबंद करण्यास सापळा रचला व वाघास जेरबंद केले.
नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात डॉ.आर.एस.खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर तथा आरआरटी प्रमख ए.सी.मराठे, पोलीस नाईक,(शुटर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, आरआरटी.सदस्य दिपेश.डि.टेंभुर्णे, योगेश. डि.लाकडे, गुरुनानक वि.ढोरे वसीम.ऐन.शेख, विकाश.एस.ताजने, प्रफुल.एन.वाटगुरे, ए. डी. कोरपे आर.आर. टी.वाहनचालक, ए. एम. दांडेकर आर.आर.टी.पथकाचे वाहनचालक कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here