The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २४ सप्टेंबर : गडचिरोली आगाराची एम2एच ४० एन८९५० क्रमांकाची बस ही आज २४ सप्टेंबर रोजी दुपारी ०१:०० वाजता गडचिरोली येथुन सोडण्यात आली आणि लेखा गावा नजीक येवुन पंचर झाल्याने बस मधील प्रवासी त्रस्त झाले. यामुळे बसमधील प्रवाशांची गैरसोय झाली.
एस टि.महामंडळाच्या भंगार बसने नेहमीच प्रवाशांचे हाल होतांना दिसतात. गडचिरोली आगाराची गडचिरोली ते मुरुमगाव बस दुपारी ०१:०० वाजता सुटल्यानंतर लेखा गावाजवळ येवून पंचर झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. सध्या बसचे पंचर होने, टपर उडने, पाणी गळणे असे सर्रास प्रकार पहायला मिळते. त्यामुळे बसने प्रवास किती सुखदायक आहे हे लोकांना पटायला लागले. प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असताना आगाराचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे भंगार अवस्थेत आहे. अशा भंगार बसेसचा प्रवाशांना होनारा त्रास थांबविण्यात यावे अशी मागणी होत आहे.