गडचिरोली : तंबाखू तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

621

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली सुगंधित तंबाखू राज्यात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची धडक कारवाई २२ एप्रिल रोजी अर्जुनी–देसाईगंज मार्गावर करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई पार पडली.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सिल्व्हर रंगाच्या टोयोटा इनोव्हा (MH-15-BN-5689) या वाहनाला अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात ५,४४,३०४ रुपयांची सुगंधित तंबाखू आढळून आली.या तंबाखूची मालकी रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) याची असल्याचे चालक अस्पाक मुन्ना शेख (वय २५, रा. संजयनगर, पिंडकेपार, जि. गोंदिया) याने कबूल केले. सुगंधित तंबाखू व्यतिरिक्त ३,८०,००० रुपयांचे इनोव्हा वाहन देखील जप्त करण्यात आले असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ९,२४,३०४ रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता-२०२३ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. संदिप आगरकर हे पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सरीता मरकाम, दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, सचिन घुबडे, निशिकांत अलोणे व निकेश कोडापे यांच्या पथकाने केली. सदर कारवाईने अविद्या व्यावसायिकांचे, तस्करांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here