गडचिरोली : ११ प्रमुख मार्गावरील वाहतूक अद्यापही बंद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने तसेच सततच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग अद्यापही बंद असून आता ११ मार्ग बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे जिल्ह्यातील बंद असलेल्या मार्गाबाबत (सायंकाळी ०५.०० वाजतापर्यंत) माहिती प्राप्त झाली आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग ( दि.24.7.2024 वेळ सायंकाळी 5.00 वाजेर्यंत )
1)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता. गडचिरोली (पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी )
2)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) (पेरमिली नाला)ता. भामरागड
3)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता. गडचिरोली
4) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी
5) लखमापूर बोरी गणपुर रस्ता प्रजिमा (हळदीमाल नाला) ता. चोमोर्शी
6) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा ता. चामोर्शी (पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव)
7) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता, प्रजिमा ता. सिरोंचा
8) मानापुर अंगारा रस्ता प्रजिमा ता. कुरखेडा
9) पोर्ला वडधा उराडी कढोली रस्ता ता. कुरखेडा
10)) आष्टी सावली रस्ता ग्रामीण मार्ग ता. मुलचेरा
11) एटापल्ली मरपल्ली वसामुंडी रस्ता ग्रामीण मार्ग (मरपल्ली नाला) ता. एटापल्ली
टीप : इथे नाव नसलेले मार्ग सुरू आहेत असे समजावे. जस – जशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे प्राप्त होत जाईल त्याप्रमाणे अपडेट करण्यात येत जाईल. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे प्राप्त झाली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #gadchirolidistrict)