The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २१ ऑक्टोबर : जंगलालगत असलेल्या शेतात काम आटोपून जंगलात सरपण गोळा करत असतांना हिंस्त्र वन्यप्राण्याने हल्ला करून महिलेला ठार केल्याची घटना शनिवार २१ ऑक्टोबर रोजी कुरखेडा तालुक्यात घडली. सायत्राबाई अंताराम बोगा (५५) रा. ठुसी असे मृतक महिलेचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिक ठार झाल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. कधी गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, धानोरा तर कधी कुरखेडा तालुक्यातील घटना समोर येत आहेत. कधी वाघाचा हल्ला तर कधी ओडीसा राज्यातून आलेल्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेला आहे. आज कुरखेडा तालुक्यातील ठुसी गावातील महिला ही जंगललगत असलेल्या शेतात काम आटोपून जंगलात सरपण गोळा करण्यात करिता गेली होती. दरम्यान बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने जंगलात काही नागरिकांनी शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळून आली. तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या. महिलेवर हल्ला करणारा प्राणी वाघ आहे की बिबट हा संभ्रम मात्र कायम असून गावकऱ्यांनी वाघानेच हल्ला केला असा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी करीता कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात आणले. नेमका कोणत्या प्राणी ने हल्ला करत ठार केले याची तज्ञानकडून तपासणी सुरू असून त्यांचा अहवाल आल्यानंतरच ते कळणार आहे. मृतकाचा पश्चात पती,दोन मूले, मूलगी, सूना नातवंड व बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्या या अशा मृत्यूने परिवारावर शोककळा पसरली आहे.
(kurkheda, the gadvishva, Gadchiroli News Updates, dushi yengalkheda, Tiger attack, wild elephant attack, armori, dhanora, desaiganj, wadasa, dhanora)