– श्रद्धा देशमुख प्रथम
The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : ICSE बोर्डाचा २०२३-२०२४ चा निकाल सोमवार ०६ मे रोजी जाहीर झाला. वियानी विद्यानिकेतन ही गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव ICSE बोर्डाचा शिक्षण देणारी शाळा असून दरवर्षीप्रमाणे वियाणी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवत शाळेचे विद्यार्थी सातत्याने उत्कृष्ट निकाल मिळवत आले आहेत. यंदाही सलग त्यांचा दहावीच्या ICSE बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे.
एकूण ६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ८ जणांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण तर २६ जणांनी ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले. शाळेच्या निकालात श्रध्दा देशमुख हिने ९४.८ टक्के गुण मिळवीत अव्वल स्थान मिळविले तर अंकीता विश्वास ९४ टक्के, हर्ष ताकसांडे ९३.८ टक्के आयूध दूधे ९३.४ टक्के गुण प्राप्त केले आहे. वियानी विद्या निकेतन शाळेचे मुख्याध्यापक फादर टॉमी यांनी आपल्या शाळेचा १०० टक्के निकाल लागल्याचे सांगितले. अशी कामगीरी करणे हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या मेहनती शिवाय शक्य नसल्याचेही ते म्हणाले. शिवाय फादर टॉमी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि संपूर्ण शिक्षकांच्या टीमचे देखील आभार मानले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #icseboardresult2024 #gadchiroli #viyanividyaniketanschoolgadchiroli )