– काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : कधी नव्हे तर जिल्ह्याच्या इतिहासात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवून नवा इतिहास रचला, मात्र या सोबतच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांच्या भुवया उंचावल्या, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतील येथील नागरिकांशी संवाद साधतील अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना मदत म्हूणन जिल्ह्याला सह पालकमंत्री सुद्धा देण्यात आले, मात्र विधानसभा निवडणूकी नंत्तर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक ३१ जानेवारी रोजी, सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातुन पार पडणार असून, जिल्ह्याला ऐक नव्हे तर दोन – दोन पालकमंत्री असताना देखील नियोजन समितीची बैठक ऑनलाईन का ? असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटी चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर बैठक ऑनलाईन असतांना देखील मुख्यमंत्री फडणवीस हे बैठीकस राहु शकत नाही हे देखील मोठी शोकांतिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले का? की फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा करून, देण्यासाठी पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवले असाही प्रश्न महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील असंख्य नागरिक विविध समस्यांना घेऊन मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, अनेक शेतकऱ्याचे धानाचे चुकारे अजून मिळाले नाही, घरकुल धारकांच्या अनेक समस्या आहेत, जिल्ह्यातील रानटी जनावरांचे बंदोबस्त संदर्भातील समस्या आहेत, जिल्ह्यातील रस्ते, दवाखाने सारख्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे अनेक कंत्राट दारावर उपास मारीची वेळ आलेली आहे असे अनेक समस्या असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यासाठी वेळ देत नसतील तर जिल्ह्यातील नागरिकांना पाकमंत्री हटाओ गडचिरोली जिल्हा बचाओ अशी मोहीम राबविण्याची वेळ येईल का असेही मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.