गडचिरोली : उद्या ३४८ पोलीस शिपाई पदांकरीता लेखी परीक्षा

1026

– ३३०७ उमेदवार देणार परीक्षा
The गडविश्व
गडचिरोली, १ एप्रिल : गडचिरोली पोलीस दलातर्फे ३४८ पोलीस शिपाई पदांकरिता उद्या २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा सकाळी ०८.३० वा. पार पडणार असून यामध्ये पहिला पेपर सामान्य ज्ञान या विषयाचा सकाळी ०८.३० ते १०.०० या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी ११.०० ते १२.३० वा. दरम्याण घेण्यात येणार आहे. याकरिता पात्र एकुण ३३०७ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत.
३४८ पोलीस शिपाई पदांकरिता ६ जानेवारी २०२३ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदाणी चाचणी घेण्यात आली होती. मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण ३३०७ उमेदवारांची लेखी परीक्षा उद्या ०२ एप्रिल २०२३ रोजीचे सकाळी ०८.३० वा. आयोजीत करण्यात आलेली आहे.

हि आहेत ०६ परीक्षा केंद्र

१) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली
२ ) शिवाजी इंग्लीश ॲकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली
३) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली
४) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली
५) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली
६) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ)

परीक्षेकरिता उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी ०५:३० वा. उपस्थित राहणे आवश्यक राहील. पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांनी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या लेखी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन लेखी परिक्षेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक कागदपत्रानिशी उपस्थित राहावे. तसेच सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. सोबतच परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सोबतच पहील्या व दुसऱ्या पेपरच्या मधल्या वेळेत नाश्त्याची सुद्धा सोय उमेदवारांसाठी करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये कुणीही बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोबत बाळगणार नाहीत व कोणताही गैरप्रकार करणार नाही. उमेदवाराला फक्त सोबत ओळखपत्र, प्रवेशपत्र व पाणी बॉटल घेऊन जाण्याची मुभा राहील. कोणताही उमेदवार गैरप्रकार किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करतांना आढळुन आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर माहिती द्यावी, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी केलेले आहे. या लेखी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. व इतर अधिकारी यांनी परीक्षा केंद्रांची पाहणी केली.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Hailey Bieber) (France) (3 IDIOTS SEQUEL) (Chor Nikal Ke Bhaga Review) (Ajith Kumar father) (Police recrutment 2021) (gadchiroli Police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here