– कमलापूर हत्तीकॅम्पमधील दुर्मिळ घटना, तरुणांविरुद्ध व्यक्त होत आहे संताप
The गडविश्व
गडचिरोली, २५ जून : मुक्या प्राण्यांना जेवढे प्रेम द्याल तेवढे ते सुद्धा आपल्याशी चांगले वागतात असे म्हणतात मात्र जर का त्यांच्याशी छेडखानी केली तर काही खैर नाही. अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या कमलापूर हत्तीकॅम्प परिसरात घडली.
झाले असे की, कमलापूर हत्तीकॅम्पमधील हत्ती सायंकाळच्या सुमारास मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडले जातात. शनिवारी येथील हत्तीण मंगला ही कमलापूर-दामरंचा मार्गावर असताना काही तरुण तिच्या नजीक जाऊन आवाज काढून व हातवारे करून चिडवत होते. यावेळी संतापलेल्या मंगला हतीनेने सोंड पुढे केल्याने तरुणांनी दुचाकी सोडून पळ काढला. दरम्यान हतीनेने सोंडेने दुचाकीं फिरवत पायाखाली चिरडली यात दुचाकींचा चेंदामेंदा करून नुकसान झाले व तरुण थोडक्यात बचावले. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी मोबाइल मध्ये कैद केला. त्याची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर वायरल होत असून अद्यापपर्यंत हत्तीकॅम्प मधील हत्ती कुणावर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही हि घटना दुर्मिळ असून हत्तीणीला डिवचनाऱ्या तरुणांनाविरोधात पर्यटनप्रेमींनी नाराजी व्यक करत इतरांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोली : कमलापुरातील मंगला हत्तीणी मुक्त विहार करतांना तरुणाने डिवचले, मग झाले असे काही….#gadchiroli #kamlapur pic.twitter.com/V08HX3LStO
— THE GADVISHVA (@gadvishva) June 25, 2023
(the gdv, the gadvishva, gadchiroli, kamlapur elephant camp)