गडचिरोली : रांगोळीतून चित्र रेखाटणारे प्रसिद्ध पेंटर युवराज बेहरे यांचे अपघाती निधन

388

– अपघातात पत्नी व चालक गंभीर
The गडविश्व
गडचिरोली, १८ जून : जिल्ह्यात प्रसिद्ध व ख्यातनामक असलेले  रांगोळीतून चित्र रेखाटणारे प्रसिद्ध पेंटर युवराज बेहरे (५०) यांचे पहाटेच्या सुमारास नागपूर -अमरावती महामार्गावर चारचाकी वाहनाचा अपघात होऊन दुःखद निधन झाले. सदर घटनेने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात पत्नी विभा बेहरे (४५) व चालक ऋशी बोरकुटे (३०) रा. काटली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार, मृतक युवराज बेहरे हे मित्र व आपल्या परिवारासह दोन वाहनाने महाराष्ट्र दर्शनाकरिता गेले होते अशी माहिती आहे. दरम्यान काल शेगाव येथून दर्शन घेऊन परत येत असताना एमएच ३४ वी ३४२९ क्रमांकाच्या वाहनाने अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कार पूर्णतः क्षतीग्रस्त झाली. त्यांच्या मृत्यूपश्चात २ मुले , पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

अशाप्रकारे रांगोळीतून चित्र रेखाटत होते. बेहरे यांनी रेखाटलेली रांगोळी

मृतक युवराज बेहरे हे सुप्रसिद्ध रांगोळी पेंटर म्हणून ओळखले जायचे. लग्नकार्य, समारंभ व इतर कार्यक्रमात ते आपल्या कलेने विविध प्रकारची रांगोळी, रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटत होते. आतापर्यंत अनेक कार्यक्रमात त्यांनी आपल्या कलेतून विविध चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले आहे. अगदी हुबेहूब चित्र ते रांगोळीच्या माध्यमातून रेखाटत होते. त्यांच्या या अशा अपघाती निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत असा कलाकार एकाएकी जाण्याने विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या अपघाती निधनाने बेहरे कुटुंबावर शोककळा पसरली पसरली असून जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, behare arta gadchiroli, acccident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here