The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ जून : तालुक्यातील गणेश अलंकार विद्यालय निमगाव शाळेचा नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीचा निकाल ९० टक्के लागलेला आहे. यात शाळेतुन प्रथम क्रमांक अपेक्षा वासेकर हीने मिळविला. याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले.
शाळेच्या वतीने गुणवंत विध्यार्थी म्हणून वर्ग दहावीच्या परिक्षेत ७५ टक्के मिळविले आहे. तिचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
मार्च २०२३ मध्ये बोर्डाने ऑनलाईन निकाल घोषित केला त्यात विद्यालयाचा निकाल ९० टक्के जाहीर झालेला असून गुणक्रमे प्रथम अपेक्षा वासेकर ७५.२० टक्के, द्वितीय मोहित कोकोडे ७३.२० टक्के, तृतीय प्रिया वासनिक ६६.८० टक्के, चतुर्थी स्थानी पूजा बहयाळ ६६.२० टक्के पटकाविले आहे. शाळेत गुणानुक्रमांक प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. तर डि.आर.भोयर, कु. श्रीरामे मँडम, एस.व्हि.नागदेवते, व्हि.पि.
नाकतोडे यांनी अभिनंदन केले. त्यावेळी भुनेश्वर गजभे, बबलू गेडाम, ज्ञानेश्वर लोहारे आदी कर्मचारी उपस्थित होते.