खरेदी विक्री संघाच्या सदस्यपदी गणेशराव नरवाडे यांची बिनविरोध निवड

317

The गडविश्व
प्रतिनिधी, ढाणकी (प्रवीण जोशी), २२ फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षांपासून ढाणकी शहरातील राजकारण व सामाजिक व अनेक प्रसंगातील घडामोडीत तत्पर राहून आपला वेगळाच ठसा उमटवणारे गणेशराव नरवाडे यांची खरेदी-विक्री संघाच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शेतकरी तालुका प्रमुख गणेशराव नरवाडे यांची खरेदी विक्री संघाच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गणेशराव नरवाडे हे ढाणकी शहरवासीयांना चांगल्या प्रकारे सुपरीचीत आहेत. ज्या वेळी सत्तेत नसताना विरोधक म्हणून होते त्या वेळी जनतेच्या हक्कासाठी वेळोवेळी जनतेची बाजू मांडून त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे तर ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस जनतेच्या प्रश्नाला थेट हात घालून अनेक अडचणी समजून घेणे व त्यांची अडचण मार्गी लावणे ही शैली ढाणकी शहरवासीयांनी बघितली असून गेल्या दोन दशकांपासून ढाणकी शहराच्या राजकारणात ते सक्रिय आहे तसेच ढाणकी हे ग्रामपंचायत असतांना ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच होते व तशा प्रकारचा त्यांचा प्रवास राहिल्या मुळे त्यांना अनेक जनतेच्या नेमक्या अडचणी ज्ञात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्याच्या अडचणीची त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे. त्यामुळे बिनविरोध निवड झाली ती योग्य आहे असे जनतेमधून बोलल्या जात आहे.
त्यांच्या निवडीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here