– मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, यांची नोंदणी केली जाणार
The गडविश्व
गडचिरोली , दि. ०४ : राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा गडचिरोली तालुक्यातील नवेगाव व बोदली जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत नियोजित करण्यात आला असून ४ ऑक्टोंबर रोजी नवेगाव येथे सकाळी ११ वाजता तर बोदली येथे दुपारी २ वाजता होणार आहे. तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी लाडक्या बहिणींना केले आहे.
सदर मेळावा नवेगाव येथे प्रसन्ना हॉल नवेगाव पेट्रोल पंप जवळ सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजता बोदली येथील ग्रामपंचायत पटांगणाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.