‘सर्च’ रुग्णालयात जनरल सर्जरी कॅम्प

79

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात मुंबईचे डॉ. प्रितम पठारे (General Surgeon) यांच्या नेतृत्वात २६ ते २८ एप्रिल २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे. सर्चद्वारे मागील १८ वर्षापासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जाते. ज्या रूग्णांना हायड्रोसील, हर्निया, अपेंडीक्स व शरीरावरील गाठी या प्रकारची लक्षणे असल्यास सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशनपूर्व तपासणी करुन घ्यावी व या शिबिरासाठी आपले नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी २६ ते २८ एप्रिल २०२४ रोजी होणार्‍या जनरल सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून सर्जरी करिता आपले नाव नोंदवावे व ऑपरेशन सुविधेचा लाभ करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here