जिल्हयाचा विकास व जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक संधी द्या : आमदार डॉ. देवराव होळी

170

– महायुतीच्या महामेळाव्यात जनतेला आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : आपण मागील १० वर्षापासून गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या केवळ विकासासाठी प्रयत्न करीत असून मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणारी विकास कामे केलेली आहे. परंतु अजूनही मागास असलेल्या या जिल्ह्याचा मोठा प्रमाणावर विकास होण्याची आवश्यकता आहे त्याकरिता जनतेने मला पुन्हा या जिल्ह्याच्या विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी एकदा संधी द्यावी व पुन्हा आमदार म्हणून निवडून द्यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील महायुतीच्या महामेळाव्याप्रसंगी उपस्थित प्रचंड जन समुदायाला मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार ,भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, बंगाली आघाडीचे दीपक हलदर, प्रशांत भृगुवार, विलास दशमुखे, मारोतराव इचोडकर , शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार, भाजपाच्या नेत्या प्रतिभा चौधरी, शहराचे अध्यक्ष कविता ऊरकुडे, यांच्यासह महायुतीचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
महायुतीच्या महामेळावाला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जनतेने प्रचंड गर्दी करून आमदार डॉ. देवराव होळी यांना आपले मोठे जनसमर्थन असल्याचे दाखवून दिले. ढोल ताशांच्या गजरात आदिवासी नृत्य व बैलबंडीच्या जोड्यांनी भव्य मिरवणूक काढून आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या भव्य रॅलीने संपूर्ण गडचिरोली भाजपमय झाल्याचे दिसून आले. आपण मागील दहा वर्षात जनतेच्या कल्याणासाठी विश्रांती न घेता सतत काम केलेले आहे मागील ५० वर्षात कधी न झालेला विकास आपण या १० वर्षात करून दाखवला. आपल्या विकास कामांच्या आधारावर जनता मला नक्कीच पुन्हा एकदा नक्की संधी देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here