The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २८ मार्च : गेल्या २ वर्षापासून कोरोना ही महामारी आपल्या सभोवताली गोंगावत असताना कुठेलेही धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी होती त्यामुळे कुठलेही धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम झाले नाही त्यामुळे अनेक भाविक भक्त मुकल्या गेले. विशेष करून आध्यात्मिक व भाविक मंडळी कार्यक्रमापासून वंचित राहिली लहानग्यांना दूरचित्रवाणी व तरूणांना व्हॉटसअप आणि इतर मोबाईलच्या सुविधेमधे अगदी सहजपणे दिवस निघून जातात पण वृध्द मंडळींना यांच्याशी काहीही घेणे देणे नसते ते फक्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कुठे आहे याच्याच शोधात असतात.
ढाणकी शहरात श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन २२ ते २८ मार्च २०२३ दरम्यान ढाणकी येथील स्वामी विवेकानंद वसतिगृहात करण्यात आले होते. त्याची सांगता २८ मार्च रोजी विवेकानंद वसतिगृहात अत्यंत भक्तीयुक्त वातावरणात भागवत कथाकार राजेंद्र महाराज गुंजकर यांचे सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने झाली यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. भागवत कीर्तनात महाराजांनी मानव जन्म हा अमूल्य असून जास्तीत जास्त वेळ हा सत्कर्मात घालून परमेश्वराच्या भक्तीत घालावा तरच मोक्ष प्राप्ती होईल असे विविध दाखले देत उपस्थित असलेल्या भाविकांना सांगितले. भागवत कथे दरम्यान विविध कार्यक्रम घेऊन ढाणकीकराना ईश्वराच्या नाम स्मरणाची महत्ती महाराजानी विषद केली त्यांना लक्ष्मीकांत महाराज यांनी हार्मोनियम वर साथ दिली व तबला वादक म्हणून श्रीकृष्ण टाले यांनी तेवढीच मधुर संगीत साथ दिली आणि सिंथ वादक म्हणून अभिषेक टाले यांनी मोलाची कामगिरी बजावली .

या कार्यक्रमामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले ,शुभ चींतावे, शुभ इच्छावें, वचनी शुभ, बोलावे सत्कर्माच्या पुण्याईने मानव जन्माचे सार्थक करावे साधू संत येती घरा तो ची दिवाळी दसरा अशा स्वरूपाचा प्रत्यय आला भागवत कथा ऐकून रिफ्रेश झाल्यासारखे वाटले. वातावरण प्रसन्न झाले .
सुरेश नारायणलालजी जयस्वाल
नगराध्यक्ष ढाणकी