गोंडवाना विद्यापीठाच्या नियोजनशुन्य कामावर खेळाडू विद्यार्थ्यांनी व्यक्त केला रोष

749

– आंतरमहाविद्यालयीन मैदानी खेळावर विद्यार्थी नाराज
The गडविश्व
गडचिरोली, २५ नोव्हेंबर : गोंडवाना विद्यापिठामार्फत आंतरमहाविद्यालयीन वार्षिक ॲथेलेटिक्स मीट २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन २४ ते २६ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे करण्यात आले होते मात्र सदर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गोंडवाना विद्यापीठाच्या नियोजनशुन्य कामावर मात्र विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करत विद्यापीठात सर्व विद्यार्थी दाखल झाले होते.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शारीरीक शिक्षण आणि क्रीडा विभागाने २४ ते २६ नोव्हेंबर २०२२ रोजी वार्षिक ऍथेलेटिक्स मीट २०२२-२३ चे आयोजन केले. यादरम्यान गोंडवान विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थी गडचिरोली येथे दाखल झाले होते. सदर क्रिडा स्पर्धे करीता एमआयडीसी चे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र सदर मैदान खेळाडू विद्यार्थ्यानी योग्य नसल्याने त्या मैदानावर खेळास नकार देत इतर मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. असे असतांनाही खेळाची वेळ आणि खेळाचे उदघाटन रितसर होणे आवश्यक होते मात्र विद्यापीठाच्या नियोजनशुन्य कामामुळे तसे काहीही झाले नाही. एमआयडीसी मैदानावर विद्यार्थी आले असता पिण्याची पाण्याची सोय नव्हती काही वेळानंतर ती सोया करण्यात आली, पेंडाल नव्हते त्यामुळे उन्हापासून बचावासाठी खेळाडू विद्यार्थी झाडाचा आसरा घेतांना दिसत होते, मैदान सुव्यवस्थित नसल्याने या ठिकाणी खेळणे खडतर असल्याने काही इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सुध्दा सवाल करीत होते. मैदानावर खेळाडू विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करीत विद्यापीठाप्रती रोष व्यक्त केला व आपला मोर्चा विद्यापीठावर वळवला. यादरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखन यांच्याशी सखोल चर्चा केली. आता सदर स्पर्धा हि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घेण्याचे ठरले आहे अशी माहिती आहे. मात्र सदर प्रकाराने मात्र खेळाडू विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली.

#The Gadvishva #Gondwana University Gadchiroli #Sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here