गोंडवाना विद्यापीठाचा मानव तस्करी विरोधातील वॉक फॉर फ्रीडम पदयात्रेत सहभाग

182

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधीकरण विभाग आणि व्हीजन रेस्क्यू संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानव तस्करी विरोधात जनजागृतीसाठी वॉक फॉर फ्रिडम या मुक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरूवात सकाळी ७ वाजता जिल्हा विधी सेवा कार्यालया पासून झाली त्यात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये यांनी सहभाग घेतला तत्पुर्वी एक प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधीकरण न्यायाधीश आर.आर.पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व पदयात्रेला झेंडी दाखवून ही पदयात्रा अत्यंत शांतता आणि शिस्तबद्धतेत सुरू झाली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि मानवी तस्करी कशा स्वरूपात आज समाजात घडत आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी होत असलेल्या विविध प्रकारच्या व विविध हेतूच्या मानव तस्करीच्या घटना सांगत या सामाजिक ज्वलंत प्रश्नांविषयाची जाणीव ठेऊन कठोर पाऊले उचलण्याची गरज समजाऊन सांगितली. त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना मानव तस्करी विरोधात योगदान देण्यासाठी शपथ दिली. या प्रसंगी व्हीजन रेसकू संस्था, मुंबई यांच्या वतीने तुलना देवगडे, गोंडवाना विद्यापीठाचे रा. से यो संचालक, डॉ. श्याम खंडारे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद आर. जावरे व शहरातील विविध महाविद्यालयातील इतरही कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. ही रॅली गडचिरोली शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांसोबत एकरूप होऊन जिल्हा न्यायालय परिसर येथून आयटीआय चौक व नंतर पुढे एलआयसी चौक मार्गे परतीच्या दिशेने पोलिस संकुल जवळून जिल्हा न्यायालय परिसर येथे येऊन थांबली व न्यायालय परिसरात रॅलीची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here