गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ च्या परीक्षा १६ मार्च पासून

356

– बी.एड.,बी.पी. एड., व एम.एड. प्रथम सत्र अभ्यासक्रमाकरीता परीक्षा
The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : गोंडवाना विद्यापीठाच्या बी. एड.,बी.पी. एड., व एम.एड. प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२२ च्या परीक्षा १६ मार्च २०२३ पासून सुरू होणार असून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र निर्गमीत केलेले आहे.
त्याअनुषंगाने सर्व केंद्रावर विद्यापीठाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार असून यात कुठलाही बदल विद्यापीठाने केलेला नाही. याबाबतची सर्व संबंधीतांनी नोंद घेवून वेळापत्रकानुसार नेमून दिलेल्या महाविद्यालयात परीक्षा घ्यावी असे परिपत्रकाद्वारे संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी कळविले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) ( Northern Lights) (Inter Milan) (Gondwana University Winter 2022 Examination from 16th March)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here