गोंडवाना विद्यापीठाचा गुणदानात भोंगळ कारभार : ४२ गुण असूनही विद्यार्थी झाले नापास

2822

The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : गडचिरोली आणि चंद्र्पुर जिल्ह्याकरिता गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठ या ना त्या गलथान कारभाराने प्रचलितही होत आहे. नुकताच झालेल्या पदवीच्या परीक्षेत ४२ गुण असूनही विद्यार्थी झाले नापास झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा गोंडवाना विद्यापीठाचा गुणदानात भोंगळ कारभार पुढे आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी शाखेच्या सेमिस्टर चे निकाल जाहिर करण्यात आले. यामध्ये एक दोन विद्यार्थ्यांना नाहीतर शेकडो विद्यार्थ्यांना इंग्रजी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, झूलॉजी, केमिस्ट्री व इतर विषयामध्ये शून्य, एक, दोन, तीन, पाच असे गुण देण्यात आले जे की थेरी विषयामध्ये शून्य, एक मार्क्स मिळणे कधीच शक्य नाही ते असे चुकीचे गुण देऊन शक्य करून दाखविले. एवढेच नाहीतर मिलीटरी सायन्स, समाजशास्त्र विषयात ४२ आणि ४५ गुण असून सुद्धा निकाल नापास म्हणून देण्यात आला. जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला ला उपस्थित होते आणि वायवा ला सुद्धा उपस्थित होते त्यांना सुद्धा नापास करण्यात आले आहे त्यामुळे नेमके कोणत्या कारणांनी असे नापास करण्यात आले हे मात्र शोधणे संशोधनाचा विषय आहे.
अशा या गलथान कारभाराने गडचिरोली, चंद्रपूर सारख्या ग्रामीण भागांतील स्वातंत्र्यानंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीच्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्याकन करिता प्रत्येक विषयानुसार ५०० रुपये शुल्क द्यावा लागतो जे की ते महाराष्ट्रातील इतर विद्यापीठामध्ये २५० रुपये आहे. हे करून सुध्दा विद्यार्थी पास होत नाही. यामुळे विद्यार्थी वारंवार नापास झाल्याने उच्चशिक्षण सोडून देतो आणि तो बेरोजगार बनतो यास जबाबदार सर्वस्वी विद्यापीठ गुणदान विभाग आहे. हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु कोणत्याही महाविद्यालयातील प्राचार्य किंवा विद्यार्थी संघटनेने याकडे लक्ष दिले नाही. मात्र आता याची दखल घेऊन मानव अधिकार संरक्षण मंच व नेचर फाउंडेशन नागपूर चे सचिव निलेश ननावरे यांनी कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ मार्फ़त राज्यपाल, मुख्यमंत्री, तंत्र व शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना या सर्व प्रकरणाची तातडीने विभागीय चौकशी करण्यात यावी या करिता निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here