गोंडवाना विद्यापीठाचा ‘स्वच्छतादूत’ लघुपट ठरला प्रथम मानकरी

1004

The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : राजभवनद्वारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या विसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवा (इंद्रधनुष्य) मध्ये लघुपट निर्मिती स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचा ‘स्वच्छतादूत’ लघुपट प्रथम मानकरी ठरला आहे. प्रसिध्द अभिनेत्री गिरीजा प्रभू यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करुन गोंडवाना विद्यापीठाला सन्मानीत करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने स्वच्छता कामगारांवर आधारित ‘स्वच्छतादूत’ हा लघुपट सादर करण्यात आला होता. लघुपटाचे दिग्दर्शन क्रांतीवीर सिडाम यांनी केले असून प्रमुख भूमिका साक्षी देशमुख हिने साकारली आहे. राज्यातील कृषी व अकृषी अशा २४ सहभागी विद्यापीठांमधून गोंडवाना विद्यापीठाच्या ‘स्वच्छतादूत’ या लघुटाची निवड करण्यात आली.यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण व विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम यांचे विशेष सहकार्य लाभले. लघुपटाची कथा व संकल्पना जनसंवाद विभागाचे सहा. प्राध्यापक रोहित बापू कांबळे यांची असून लघुपटनिर्मितीसाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाच्या चमूचे सहा. प्राध्यापक राहूल ढबाले यांनी संघनायक म्हणून तर सहा. प्राध्यापक श्रीमती मंगला बन्सोड यांनी संघनायिका म्हणून प्रतिनिधित्व केले. विद्यापीठाच्या यशस्वीतेबद्दल कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी सहभागी सर्व विद्यार्थींचे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रिया गेडाम तसेच त्यांच्या चमूचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gondwanauniversity )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here