झोमॅटो, स्विगी, ओला,ॲमेजॅन, फ्लिपकार्ट कामगारांसाठी सरकारचा पुढाकार ; ई-श्रम पोर्टलवर मोफत नोंदणी करण्याचे आवाहन, अशी करा नोंदणी

301

The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : केंद्र शासनातर्फे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा मोठा डाटाबेस तयार करून शासनास कामगारांसाठी उपयुक्त निती बनविणे शक्य होईल याकरिता सदर ई-श्रम पोर्टलची निर्मीती करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने ई-श्रम पोर्टल अद्यावत करण्यात आलेले असून, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गिग कामगार (जसेकी ओला, उबर, ॲमेजॅन, फ्लिपकार्ट, झोमाटो, स्विगी इत्यादी) या क्षेत्रात काम करीत असलेल्या कामगारांनी www.eshram.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कामगारानां स्वतः ई-श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी करता येईल. तसेच कामगारानां स्वतः नोंदणी करणे शक्य नसल्यास नजिकच्या सेतू केंद्र किंवा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, गडचिरोली जिल्हाधिकारी संकुल, बॅरेक क्र. २, कॉम्पलेक्स येथे स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून ई-श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी करू शकता.
गडचिरोली जिल्हयातील गिग कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांच्या द्वारे करण्यात येत आहे.

स्वतः अशी करा मोफत नोंदणी

– ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी www.eshram.gov.in या
अधिकृत वेबसाइटला भेट द्या
– त्यानंतर मुख्यपृष्ठावर “Register on eShram” (ई-श्रमवर नोंदणी करा) हा पर्याय निवडा.
– आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. खाली दिलेला कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP” वर क्लिक करा.
– आपल्या मोबाइलवर आलेला OTP टाका. त्यानंतर ‘Verify’ बटणावर क्लिक करा.
– तुमचा आधार क्रमांक टाका.(आधारशी संबंधित माहिती आपोआप भरली जाईल.)
– पुन्हा एकदा OTP येईल, तो टाकून पडताळणी पूर्ण करा.
– त्यानंतर वैयक्तिक माहिती भरा, त्यात तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, विवाह स्थिती भरावी. तुमचं स्थायी पत्ता व वर्तमान पत्ता द्यावा.
– तसेच तुम्ही कोणत्या प्रकारच्या असंघटित कामात आहात ते निवडा (उदा. गिग वर्कर, बांधकाम मजूर, शेती कामगार, इ.)
– शिक्षण पातळी, कौशल्य, कामाचा अनुभव इ. माहिती भरा.
– तुमचं बँक खात्याचं नाव, IFSC कोड, खाती क्रमांक भरा. (ही माहिती सरकारकडून योजना मिळवण्यासाठी आवश्यक असते)
– सर्व माहिती नीट तपासून सबमिट करा.
यानंतर तुम्हाला ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्याची लिंक मिळेल. (PDF फॉर्ममध्ये)

ई-श्रम कार्ड म्हणजे काय?

हे कार्ड तुमचं शासनमान्य ओळखपत्र आहे.
यामुळे तुम्हाला श्रम मंत्रालयाच्या योजनांचा लाभ मिळवता येईल.
अपघात विमा, पेन्शन, सामाजिक सुरक्षा योजना यासाठी उपयोगी.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड (Active Mobile Number लिंक असलेलं)
बँक खात्याचे तपशील (IFSC कोडसह)
व्यवसायाची माहिती

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here