The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : राज्यपाल रमेशं बैस हे उद्या १० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता पोरला येथे संकल्प विकसित भारत आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमा करिता ते उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहे. यावेळी विविध विभागाच्या लाभार्थी ला लाभ देण्यात येणार आहे. तसेच सर्व विभागाच्या योजनेचे स्टॉल असणार आहे.
प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुशी सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प चालक प्रशांत शिर्के, सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, प्रकल्प संचालक फरेंद्र कुत्तीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, तहसीलदार, BDO, सर्व अधिकारी यांनी काल पोरला गावाची पाहणी करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रशासनाची जय्यत तय्यारी सुरू असून. ७ ते ८ हजार लोक कार्यकमाचा लाभ घेणार असल्याची माहिती आहे.