विदर्भ इंटरनॅशनल स्कुलमध्ये पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

201

The गडविश्व
गडचिरोली, २८ मार्च : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कुलमध्ये २५ मार्च रोजी पूर्वप्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पदवीदान हा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक क्षण असतो. पदवीदानानंतर त्यांचा पूर्व प्राथमिक विभाग संपलेला असून आता ते प्राथमिक विभागाचा भाग असणार आहेत.
या कार्यक्रमात सीनियर के जी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य, स्किट, गाणे गायले तसेच प्ले ग्रुप, नर्सरी आणि ज्युनियर के जी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य केले. पालकांनी त्यांच्या मुलाच्या या वर्षातील शैक्षणिक प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर शाळेने प्रदर्शनाचे आयोजन केले त्यामध्ये सीनिअर के जी च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम मॉडेल्स बनवून ते प्रदर्शित केले.
कार्यक्रमाचे संचालन स्नेहल मेश्राम मॅडम आणि रुतुजा कुंभारे मॅडम तर आभार रुतिका मामीडवार यांनी मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका निहारिका मंदारे मॅडम आणि समन्वयक समरीन धम्मानी यांनी विद्यार्थ्याना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

(The gadvishva) (the gdv) (Graduation Ceremony of Pre-Primary Students at Vidarbha International School) (gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here