The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १ सप्टेंबर : शुअरटेक हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर लि कार्डिओलॉजी पॉलीट्रॉमा सुपर स्पेशालिस्ट युनिट जामठा तथा ग्रामपंचायत कार्यालय मालेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार ०२ सप्टेंबर २०२३ ला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत साईनाथ विद्यालय मालेवाडा येथे मोफत मधूमेह तपासणी व हाडाची तपासणी, इ.सी.जी.व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिराचा कुरखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंचा अनुसया पैंदाम, उपसरपंच तुळशिदास बोगा, आनंद बोगा, रत्नाकर बांगरे, मोहन लोहबरे यांनी केले आहे.