The गडविश्व
ता. प्र/ आरमोरी, दि. १२ : तालुक्यातील जोगी साखरा येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने हनुमान जयंतीचा भव्य उत्सव पार पडला. गावातील श्री हनुमान मंदिरात अरविंद कहालकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमासाठी बजरंग दलाचे नियोजित अध्यक्ष कमलेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी सहभाग घेतला. विशेषतः विशाल सतीबावणे, आकाश राऊत, तन्मय कांबळे, आदित्य डोनाल्डकर, रवी मोहरले, शूरवीर गुणुळे, हर्ष नारनवरे, सुशील दोडके, अमर फुलबांधे, बजरंग राऊत, अर्णव फुलबांधे, साहिल जांभुळे, सुशांत धोंगडे, आश मडावी, मंगेश कुमरे, हर्षल करंबे, अभिषेक दर्वे, सुधीर जांभुळे, अंकुश, शंतनु उईके, प्रणय मसराम, सागर सतीबावणे, राहुल येडमे, अंकुश सयाम, पियूष सयाम, अक्षय सहारे, गट्टू सहारे, नरेंद्र कहालकर, संस्कार कहालकर, साहिल सतीबावणे हे युवक उत्सवात विशेष सक्रिय होते.
नवीन पिढीला सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी करून घेण्याच्या हेतूने संयोजक म्हणून महेश राऊत, भाग्यवान सहारे व दसरथ मोहरले यांनी पुढाकार घेतला.
या धार्मिक व सामाजिक उत्सवामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हनुमान जयंती निमित्त एकात्मता व संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
