शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले काय ? ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

776

The गडविश्व
गडचिरोली,दि. १३ : सन २०२२-२३, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित अनु.जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी व भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही भरपुर प्रमाणात प्रलंबित असलेले अर्ज ज्या महाविद्यालयांनी अद्याप पर्यंत या कार्यालयाकडे मंजूरी करीता सादर केलेले नाहीत, त्यांना अर्ज फॉरवर्ड करण्याची अंतिम १६ फेब्रुवारी २०२४ ही आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व व्यावसायीक / बिगर व्यावसायीक अनुदानित/विना अनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन विहित वेळेत अर्ज मंजूरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नविन अर्ज नोंदणी करण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२४ ही शेवटची संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here