The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २४ डिसेंबर : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग ११ वी व १२ वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हेल्थ केअर विषय घेऊन आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव मिळवून रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ह्या विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने हा विषय या महाविद्यालयात शिकवला जातो.आणि त्यावर योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सावसाकडे यांनी व्यावसायिक शिक्षका कु. किरण दरडे यांच्या उपस्थितीत आरोग्या विषयी माहिती सांगितली.
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य डी.टी. कोहाडे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजबे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC)