– सर्वाधिक पाऊस पोर्ला परिसरात 162.4 मिमि पावसाची नोंद
The गडविश्व
गडचिरोली, १६ जुलै : जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवमान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार काल १५ जुलै रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचुन पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहितीनुसार धरणाचे पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील 9 तासात धरणाचा विसर्ग 4,000 क्युमेक्स (1,41,260 क्युसेक्स) पर्यंत टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार आहे. तरी वैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पूर नियंत्रण कक्ष, गडचिरोली यांनी केले आहे.