‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ (गामा ) च्या संयोजकपदी हेमंत डोर्लीकर व संदिप कांबळे

337

The गडविश्व
गडचिरोली, ०७ : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे येथे ६ जानेवारी रोजी “गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन” (गामा) ची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संयोजकपदी हेमंत डोर्लीकर व संदिप कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जगभरात पसरलेले इंटरनेटचे जाळे, बदलत्या तंत्रज्ञानानुसार देशभरात “डिजिटल इंडिया” या संकल्पनेनुसार अनेक कामे डिजिटल झाली आहेत. दैनंदिन घडामोडी, बातम्या याबाबत डिजिटल मीडियाचा व्यापही मोठ्या प्रमाणात झालेला असून गडचिरोली जिल्ह्यातही डिजिटल मीडियाचा व्याप मोठ्या प्रमाणात आहे. डिजिटल मीडिया विषयी नवनवीन धोरण, कार्यप्रणाली, डिजिटल मीडियाशी निगडित पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्या शासन दरबारी मांडता याव्यात याकरिता गडचिरोली येथे ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ या संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
जगभरात इंटरनेटच्या जाळ्याने मोबाईल धारकांची संख्या वाढलेली असून डिजिटल मिडियाकडे नागरिकांचा कल वाढत हसे. झटपट काही क्षणात बातमी पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडिया कडे बघितले जाते. एखादी घटना अथवा बातमी, घडामोडी झटपट ऑनलाईन प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने काम करित आहे. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूज ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. गडचिरोली ऑल डिजिटल मीडिया असोसिएशन ही मागील दोन वर्षांपासून गडचिरोली शहरामध्ये कार्यरत असून नुकताच झालेल्या बैठकीत नव्याने संयोजकांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज), अनिल बोदलकर (एविबी न्युज), उदय धकाते (महाभारत न्युज), किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज), वेकटेश दुडमवार (गोंडवाना टाइम्स न्युज),(विदर्भ क्रांती न्युज), जगदीश कन्नाके (महाराष्ट्र टुडे न्युज) सचिन जिवतोडे (द गडविश्व), संतोष सुरपाम (संतोष भारत न्युज), मनीष कासर्लावार (विदर्भ न्युज एक्सप्रेस), प्रवीण चनावार (वृत्तवाणी), यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार परिषदांसाठी संपर्क

१) हेमंत डोर्लीकर (पूर्णसत्य न्युज पोर्टल)
मो.८८३०३४७०८७ ,९४०३९१४९८५

२) संदिप कांबळे (लोकशाही न्युज पोर्टल)
९४२१३१८०२१,९९७५०५६९५५

यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” च्या वतीने करण्यात आले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, Hemant Dorlikar and Sandeep Kamble as convenors of ‘Gadchiroli All Media Association’ (Gama).)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here