– जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु, घटनेने परिसरात खळबळ
The गडविश्व
कावर्धा, ३ एप्रिल : छत्तीसगडच्या कावर्धा जिल्ह्यात होम थिएटरमध्ये स्फोट झाल्याने या स्फोटात दोन भावांचा मृत्यू तर दीड वर्षाच्या चिमुरडीसह चार जण जखमी झाले झाल्याची घटना सोमवार ३ एप्रिल रोजी सकाळी ११ते ११. ३० वाजताच्या सुमारास घडल्याची समोर येत आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून होम थिएटरचा एवढा भीषण स्फोट झाल्याने स्फोटानंतर घराचे छत उडून गेले व भिंतही पडल्याचे समोर येत आहे.
कावर्धा जिल्ह्यातील रेंगाखार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चामरी गावात राहणाऱ्या हेमेंद्र मेरावीचे दोन दिवसांपूर्वी अंजना गावात लग्न झाले. लग्नातच त्यांना होम थिएटर मिळाले दरम्यान सोमवारी सकाळी ११ते ११.३० या वेळेत घरातील लोकांनी होम थिएटर सुरू केल्याचे सांगण्यात आले व त्याचवेळी त्यात स्फोट झाल्याचे कळते. घटनेत हेमेंद्र आणि त्याचा लहान भाऊ राजकुमारचा मृत्यू झाला तर सूरज मेरावी, शिवकुमार, सौरभ (दीड वर्ष), दीपक हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की कच्च्या घराचे छत उडून गेले व भिंतही पडली यामुळे घरातील सामान भिंतीखाली दबले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचून स्फोटाच्या कारणाचा तपास करत असल्याचे कळते. तर स्फोट झाला तेव्हा दीड वर्षाचा मुलगा शेजारीच बसला होता त्यात त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. होम थिएटरचा भीषण स्फोट होऊन एवढी मोठी घटना घडल्याने काहींच्या म्हणण्याने होम थिएटरचा एवढा भीषण स्फोट होणे शक्य नाही त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) ((Home theater explosion; Four people including a girl were injured and two died)