पोलीस अधिकाऱ्यांना शोर्य पदके जाहीर ; महाराष्ट्राला ४८ ‘पोलीस पदके’

571

The गडविश्व
नवी दिल्ली, दि. २५ : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करत असते. यावर्षी सुद्धा आज २५ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला पोलीस पदकांची आज घोषणा झाली. अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.
देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीएसएम), ९५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ४८ पदक मिळाली आहेत.
जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना अटक करताना, संबंधित अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा योग्य विचार करून जोखीम मोजली जाते आणि त्या आधारावर असामान्य शौर्य आणि शौर्य पदके (जीएम) प्रदान केली जातात. ९५ शौर्य पुरस्कारांपैकी नक्षलवाद प्रभावित भागातील २८ कर्मचारी, जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील २८ कर्मचारी, ईशान्येकडील राज्यांतील ०३ कर्मचारी आणि इतर प्रदेशातील ३६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी सन्मानित केले जात आहे. ९५ शौर्य पदकांपैकी ७८ पोलीस कर्मचारी आणि २७ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सेवेतील विशेष विशिष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदक (PSM) तर साधनसंपत्ती आणि कर्तव्यनिष्ठेने केलेल्या विशिष्ट सेवेसाठी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) प्रदान केले जाते. सेवेतील विशेष विशिष्ट कार्यासाठी देण्यात आलेल्या १०१ राष्ट्रपती पदकांपैकी (PSM) ८५ पोलीस सेवेला, ०५ अग्निशमन सेवेला, ०७ नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेला आणि ०४ सुधारात्मक सेवेला देण्यात आले आहेत.
यावर्षी देण्यात आलेल्या ७४६ गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकांपैकी (MSM) ६३४ पोलीस सेवेला, ३७ अग्निशमन सेवेला, ३९ नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेला आणि ३६ सुधारात्मक सेवेला देण्यात आले आहेत.
देशातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)

1. डॉ.रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक
2. दत्तात्रय राजाराम कराले- पोलिस महानिरीक्षक
3. सुनिल बलिरामजी फुलारी -पोलिस महानिरीक्षक
4. रामचंद्र बाबु केंडे – पोलिस कमांडंट

राज्यातील एकूण ४४ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक
2. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक
3. श्रीमती. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
4. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक
5. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक
6. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक
7. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक
8. श्रीमती. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त
9. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त
10. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक
11. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक
12. रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक
13. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक
14. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त
15. नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक
16. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक
17. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक
18. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक
19. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक
20. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक
21. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक
22. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक
23. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक
24. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक
25. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक
26. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक
27. एसएमटी. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक
28. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक
29. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक
30. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक
31. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक
32. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक
33. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल
34. संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल
35. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक
36. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल
37. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक
38. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल
39. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल

सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक
2. अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार
3. गणेश महादेव गायकवाड, हवालदार
4. प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार
5. तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार

संपुर्ण यादी

शौर्य पदके  (GM)
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदके (PSM)
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)
राज्यनिहाय आणि दलनिहाय पदक विजेत्यांची यादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here