The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१६ : तालुका संवेदनशील असुन तालुका मुख्यालयी आयडिया,वि कंपनीचा भ्रमणध्वनी मनोरा उभारुन ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी धानोरा येथील सिम धारकांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी गावात आयडिया कंपनीचे टावर आहे. ते परिसरातील लोकांना सेवा देत असल्याने परिसरातील लोकांनी आयडिया (VI) कंपनीचे सिम मोठ्या प्रमाणात वापरत आहेत.4G सेवा मिळत आहे त्यामुळे बहुतेक लोकांनी आयडिया चे सिम घेतलेले आहेत. परंतु भ्रमणध्वनी मनोरा नसल्याने घेतलेले सिम निकामी होतांना दिसतात. मोबाईलमध्ये टाकलेले सिमकार्ड कामच करित नाहीत. पण तालुका मुख्यालयी नसल्याने तालुक्यातील आयडिया सिम धारकांना नेटवर्क मिळत नाही त्यामुळे सिम धारकांना वंचित रहावे लागत आहे. तालुक्यात अनेक गावात मोबाईल कव्हरेज नसल्याने लोकांनी घेतलेले मोबाईल निकामि ठरत आहेत.
